राष्ट्रीय आंतर जिल्हा ज्युनियर अथेलेटिकस स्पर्धेसाठी निवड चाचणी

0

राजू म्हस्के

भारतीय अॅथलेटिक्स महासंघच्या वतीने २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान विशाखापतनम येथे १४ आणि १६ वर्षा खालील मुली आणि मुलांच्या राष्ट्रीय आंतर जिल्हा ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धचे आयोजन केलेले असून त्यासाठी औरंगाबाद जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने निवड चाचणी आयोजित केलेली आहे.औरंगाबाद जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित निवड चाचणी उद्या ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अॅथलेटिक्स मैदानवर होणार असून खालील गटातील अॅथलेटिक्सच्या क्रीडा प्रकारामध्ये निवड चाचणी होणार आहे. तसेच या स्पर्धेत प्रवेश निशुल्क आहे.
१४ वर्षा खालील मुले आणि मुली- १०० मी,६०० मी,उंच उडी, लांब उडी,शॉट पुट. १६ वर्षा खालील मुले आणि मुली- १०० मी,२०० मी,४०० मी,१००० मी, १०० मी(हर्दलस),उंच उडी, लांब उडी,शॉट पुट,थाळी फेक,भाला फेक.
खेळाडूंनी उद्या ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता आपल्या जन्माच्या दाखल्यासह निवड चाचणीसाठी उपस्तित राहावे असे आवाहन जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष माजी आ. श्रीकांत जोशी,सचिव डॉ फुलचंद सलामपुरे,कार्याध्यक्ष डॉ रंजन बडवणे,उपाध्यक्ष मोहन मिसाळ,कोषाध्यक्ष प्राचार्य बाबुराव गंगावणे,प्राचार्या शशिकला निळवंत,डॉ दयानंद कांबळे,प्रा.अनिल निळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here