शाहू हायस्कुलचे सुभाष भोसले आविष्कार फौंडेशनच्या गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

1

शाहू हायस्कुलचे सुभाष भोसले आविष्कार फौंडेशनच्या गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

मुरगुड प्रतिनिधी
श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कागल येथील इंग्रजी विषयाचे अध्यापक सुभाष कृष्णात भोसले यांना अविष्कार फौंडेशनच्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अक्कलकोट जि.सोलापूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणविस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहा.पोलिस आयुक्त दिपक आर्वे होते. यावेळी डॉ.अविनाश ढाकणे, जन्मेंजयराजे भोसले,संजय पवार उपस्थित होते.सुभाष भोसले यांनी आपल्या अल्पसेवेच्या काळात विद्यार्थ्यांची प्रत्येकवर्षी 100 टक्के उपस्थिती,उत्कृष्ट पटनोंदणी,तज्ज्ञ मार्गदर्शक तसेच शिक्षक भारती संघटनेचे तालुका सचिव व महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.त्यांच्या या कामाची दखल घेतच त्यांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याकामी त्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई, पेट्रन सदस्य दौलत देसाई, प्रशासनाधिकारी मंजिरी मोरे-देसाई,उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत,बाळ डेळेकर,मुख्याध्यापक एम.बी.रूग्गे, आर.जी.देशमाने,एस.ए.कुलकर्णी
काकासो भोकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

फोटो: शाहू हायस्कूलचे अध्यापक सुभाष भोसले यांना गुणवंत पुरस्काराने सन्मानीत करताना कुलगुरू मृणालिनी फडणवीस यावेळी दिपक आर्वे,अविनाश ढाकणे व अन्य

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here