जनतेकडे खासदाराचे दुर्लक्ष…..प्रा. संजय मंडलिक

0

मुरगुड प्रतिनिधी
विद्यमान खासदार धनंजय महाडीक यांनी कोल्हापूर विमानतळ व कोल्हापूर शहरातील एक दोन विकास कामे केली.मात्र त्यांनी लोकसभा मतदारसंघात कोणतेही विकास काम केले नाही.जनतेच्या कामाकडे दुर्लक्ष केले असा आरोप कोल्हापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख,मंडलीक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा.संजय मंडलीक यांनी केला.
ते मुरगूड येथे सानिका स्पोर्ट्स फौडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या प्रकाश झौतातील सामन्याच्या उद्धाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेखान जमादार होते.
.या सामन्याच्या उद्घाटनासाठी दररोज विविध पक्षातील नेतेमंडळी यांना संयोजकांना बोलवले आहे.याचा धागा पकडत प्रा.मंडलीक म्हणाले, खासदार महाडीक यांनी मुरगूड शहरासाठी कांहीच केले नाही. तरीपण त्यांना आपण बोलावले आहे. राजकीय समझौता,समतोल साधण्याचा प्रयत्न या मंडळाने केलाआहे .खासदार महाडिक यांनी ग्रामीण भागात खेळाला व खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला पाहिजे होते पण ते झाले नाही. वेळी होणाऱ्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत मला आशीर्वाद द्या तुम्हाला आणि मुरगुड वासियांना अभिप्रेत असणारे क्रिडागण व मुरगुड शहरासह लोकसभा मतदार संघाचा सर्वागिण विकास करण्यासाठी मी वचनबद्ध राहीन असे वचन दिले.
अध्यक्षिय भाषणात नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी खासदार महाडीक यांच्या वर टिका करताना, करमणूकीचे कार्यक्रम करून आम्ही मते मागत नाही.ज्या खासदारांनी मुरगुड साठी काही केले नाही त्यांना ही बोलवल्याचे समजते.त्यांनी क्रिडा क्षेत्रासाठी कोणती कामगिरी केली असा प्रश्न केला.
स्वागत सुशांत मांगोरे यांनी तर प्रास्ताविक अध्यक्ष दगडू शेणवी यांनी केले.यावेळी उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके,जयसिंगराव भोसले, धनाजी गोधडे,दिपक शिंदे, संदिप कलकुटकी,सुखदेव येरुडकर, पांडुरंग भाट,किरण गवाणकर, जीवन साळोखे,एस.व्ही.चौगले,दत्ता मंडलिक, बाजीराव गोधडे, विशाल सुर्यवंशी, सर्व नगरसेवक उपस्थित होते.सुत्रसंचालन अमर कांबळे यांनी तर आभार सागर सापळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here