अनुसूचित जमाती कल्याण समितीकडून आदिवासी भागातील विकास कामांची पाहणी

पिपरिया येथील सशस्त्र पोलीस दूरक्षेत्र केंद्राला समितीची भेट

0

गोंदिया : विधानमंडळ सचिवालयाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने जिल्ह्यात दौरा करुन आदिवासी बांधवांचे वास्तव्य असलेल्या भागात करण्यात आलेल्या विकास कामांची पाहणी करुन संवाद साधला.

यावेळी त्यांनी आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या निवास खोल्या, संगणक कक्ष, स्नानगृह, स्वयंपाक घर, शौचालयाची व शाळेच्या परिसरात असलेल्या विहिरीची पाहणी केली. इयत्ता 10 व्या वर्गाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना त्यांनी गणित तसेच सामान्य ज्ञान या विषयावरील प्रश्न विचारले. मार्चमध्ये होणाऱ्या 10 वीच्या परीक्षेची तयारी कुठपर्यंत झाली आहे याची विचारणा देखील विद्यार्थ्यांना समितीच्या सदस्यांनी केली.

पिपरिया येथील सशस्त्र पोलीस दूरक्षेत्र केंद्राला देखील समितीने भेट देऊन नक्षलप्रभावित भागात कोणत्या प्रकारे या केंद्राच्या वतीने काम करण्यात येते याची माहिती देखील समितीने घेतली. पिपरिया भागातील बेरोजगार 100 युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here