आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेला प्रारंभ

0

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर येथील लाईन बझार व पोलिस लाईन यांच्यावतीने विधानपरिषदेचे आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेला मंगळवार (दि. १४) रोजी दिमाखदार पध्दतीने सुरूवात झाली. पहिल्या उद्घाटनच्या सामन्यात शाहू फौंडेशन कोल्हापूर संघाने दिग्विजय नाईक इचलकरंजी संघाचा ५-२ गोलने पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवार (दि.१९) रोजी सायंकाळी ६ वाजता विद्युतझोतात खेळविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत इस्लामपूर,इचलकरंजी, बेळगाव सह कोल्हापुरातील १० नामवंत हॉकी संघांनी सहभाग घेतला आहे.

तत्पूर्वी या सामन्याचे उद्घाटन युवा नेते ऋतुराज पाटील, नगरसेविका स्वाती यवलुजे, माधुरी लाड, मोहन सालपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योगपती डी. डी. पाटील, ताहीर शेख, सुदाम तोरस्कर, मोहन भांडवले, धनाजी तोरस्कर, बबन पाटील, नितीन जाधव, सुमित कांबळे, इरफान सय्यद, महेंद्र पाटील, महंमद शेख, अविनाश सावंत, मोहन घाटगे, बाळू माने, विलास पाटील, दयानंद सुतार हे उपस्तीथ होते.

पहिल्या झालेल्या सामन्यात शाहू फौंडेशन कोल्हापूर संघाने दिग्विजय नाईक इचलकरंजी संघाचा ५-२ गोलनी पराभव केला. सामन्याच्या पूर्वार्धात पहिल्या मिनिटांस शाहूच्या तन्मय जाधव याने गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर शाहूच्या अनिरुद्ध पाटील याने १, तर संकेत पाटील याने ३ गोल केले. उत्तरार्धात इचलकरंजी संघाने गोलसाठी प्रयत्न केले. राकेश नलवडे याने ३२ व ३३ व्या मिनिटांस वैयक्तिक २ मैदानी गोल करत आघाडी कमी केली.परंतु सामन्याची वेळ संपल्याने हा सामना शाहू संघाने ५-२ गोलनी जिंकला. स्पर्धेत पंच म्हणून राहुल गावडे, दीपक पाटील, संजय डोंगरे, चेतन जाधव, शकील म्हालदार हे काम पाहत आहेत.

बुधवार (दि.१५ मे) चे सामने

सकाळी ७.३० वा. – संयुक्त लाईन बझार विरुद्ध पद्मा पथक
सकाळी ९ वा. – हनुमान ब्लेसिंग विरुद्ध पोलीस बॉइज
दुपारी ४ वा. – छावा मित्र मंडळ विरुद्ध कै. सुशांत फौंडेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here