‘सर्फनाला’ प्रकल्पासाठी प्रयत्नशील : अशोक चराटी

0

आजरा ( प्रतिनिधी ) :
आजरा तालुक्यातील पश्चिम भागात होत असलेला सर्फनाला प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास या प्रकल्पातील पाण्याचा तालुक्याला मोठा लाख होणार आहे. यामुळे हा प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आपला प्रयत्न सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आजरा साखर कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी यांनी सांगितले.
आजरा तालुक्याच्या पश्चिम विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. यामुळेच शासनाने या परिसरात काही ल. पा. तलाव बांधले असून या ल. पा तलावांच्या मधुमातून पाणीसाठा केला आहे. मात्र मध्यम किंवा मोठा प्रकल्प नसल्याने पावसाचे पडणारे पाणी वाहून जाते. हे पाणी अडविण्यासाठी सर्फनाला प्रकल्प हा सक्षम पर्याय आहे. या प्रकल्पाचे ७० टक्केपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. ज्या प्रकल्पग्रस्तांना जमीन हवी आहे त्यांना जमीन देण्यासाठी लाखक्षेत्रात जमीन उपलब्ध आहे. तर जे धरणग्रस्त शेतकरी जमिनीऐवजी विशेष आर्थिक पॅकेज स्वीकारणार आहेत त्यांना पॅकेज देण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे. या प्रकल्पाच्या झालेल्या कामाची माहिती तसेच धरणग्रस्तांचे पुनर्वसन कोणत्या टप्प्यावर आहे याचीही माहिती राज्याचे महसूल, पुनर्वसन व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. या प्रकल्पामध्ये पाणी साठल्यानंतर पश्चिम भागासह आजरा शरापर्यंत आणि तेथूनही पुढे हिरण्यकेशी नदीतून पाणी सोडता येणार आहे. आजरा तालुक्यातील सर्फनाल्यासह उचांगी व आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनपातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. तालुक्यातील पाणी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. पाणी उपलब्ध झाल्यानंतर उसाचे उत्पादन वाढून कारखाना स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे. तर यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचविण्यात मदत होणार आहे. याकरिता या प्रकल्पाची पूर्तता करणे हे आपले ध्येय असून यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे चराटी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here