संजय मंडलिक हे ॲक्सिडेंटल प्रोफेसर- माजी आमदार पी एन पाटील यांचा भीमटोला

0

 

राधानगरी ( प्रतिनिधी ) : राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथं खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्याला माजी आमदार पी एन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, कृष्णराव किरूळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे,पी डी धुंदरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार पी एन पाटील यांनी विरोधकांवर तोफ डागली. ते म्हणाले, राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेले संजय मंडलिक अतिशय बाळबोध विधानं करत आहेत. ज्यांना खासदाराची कर्तव्यं, कार्यशैली आणि अधिकार यांचीच माहिती नाही, अशांना प्राध्यापक म्हणायचं तरी कसं?असा सवाल माजी आमदार पी एन पाटील यांनी उपस्थित केला. संजय मंडलिक यांची डिग्री एकदा तपासली पाहिजे असा टोलाही त्यांनी मारला.

यावेळी कृष्णराव पाटील, उदयसिंह पाटील कौलवकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. जालिंदर पाटील, विश्वासराव देशमुख, हिंदुराव चौगले, सुधाकर साळोखे, धैर्यशील पाटील कौलवकर,संजयसिंह पाटील, किसन उर्फ कृष्णात चौगुले, अविनाश पाटी, राजू भाटले, सागर कोंडेकर,अंबाजी पाटील यांच्यासह भोगावती कारखान्याचे सर्व संचालक, राधानगरी पंचायत समितीचे आजी माजी सभापती, सदस्य आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here