संजूबाबानं केलं पिंडदान

पूर्ण केली वडिलांची शेवटची इच्छा

0

अभिनेता संजूबाबानं आपल्या आईवडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केलीय. कारागृहातून सुटल्यानंतर माझं पिंडदान जरूर करशील, असे बाबांनी सांगितले होते, त्यामुळेच त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आज हा विधी पार पाडला, असे संजूबाबानं पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
गंगा नदीगाटावर पिता सुनील दत्त आणि आई नर्गिस यांचा श्राद्धविधी करण्यात आला. सिद्धिविनायक मंदिराचे पुजारी राजेंद्र कुमार शर्मा यांच्यासह 8 पुजाऱ्यांनी श्राद्धाची क्रिया पूर्ण केली. जवळपास अर्धा तास हा विधी चालला. भूमीचित्रपटात संजय दत्तच्या मुलीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री आदिती राव हैदरीही यावेळी हजर होती. संजय दत्त आपल्या भूमीया आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वाराणसीला आला असून प्रमोशनआधी त्याने पिंडदानाचा विधी उरकला.
विधी उरकल्यानंतर संजयला काशी विश्वनाथ मंदिर आणि काळभैरव मंदिरात दर्शनासाठी जायचे होते. मात्र चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याने कार्यक्रमात बदल करण्यात आला. तिथून संजय चित्रपटाच्या प्रमोशनसाठी थेट सनबीम शाळेत पोहोचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here