मुरगुड मध्ये क्रिकेट स्पर्धेचे दिमाखदार सोहळ्यात उदघाटन

0

मुरगुड प्रतिनिधी
खेळ, आरोग्य या बाबी सदृढ समाज उभारणीसाठी आवश्यक आहेत.त्यांना समाजातील प्रमुख व्यक्ती संस्थांनी आश्रय देणे आवश्यक असते.खेळ आणि आरोग्यातूनच पुढील पिढ्या समाज आणि देशाला सामर्थ्य व स्थैर्य देतात असे प्रतिपादन गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील यांनी केले.

मुरगुड ता कागल येथे सानिका स्पोर्ट्स फौंडेशनच्यावतीने निखिल रामाणे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या मैदान पूजन आणि शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. सलग आठ दिवस तीन ते दहा फेब्रुवारी अखेर मुरगुड येथे ही स्पर्धा संपन्न होत आहे. सुमारे तीन लाखाची रोख बक्षिसे व पारितोषिके असणारी ही स्पर्धा डे-नाईट पद्धतीने फ्लड लाईट्स मध्ये खेळवली जाणार असून स्पर्धेचे यू ट्यूब चॅनेल वरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.अतिशय भव्य स्वरूपात होणाऱ्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गोवा कर्नाटक येथील नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी प्रेक्षक गॅलरी उभारली जाणार असून त्यामध्ये 5000 प्रेक्षक बसण्याची व्यवस्था सानिका फौंडेशनने केली आहे. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक फौंडेशनच संस्थापक अध्यक्ष दगडू शेणवी यांनी केले.
स्पर्धेच्या उद्धघाटन प्रसंगी अमरसिंह घोरपडे, अनंत फर्नांडिस,संतोष वंडकर, बजरंग सोनुले,भागोजी कुंभार, एकनाथ बरकाळे,रमेश परीट,चंद्रकांत कुंभार,डॉ अशोक खंडागळे,भरत लाड,पांडुरंग कुडवे आदी उपस्थित होते.

स्पर्धेसाठी विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी एक लाख 699 व चषक, उपविजेत्या संघास 51 हजार 699 व चषक व तिसऱ्या क्रमांकासाठी 31 हजार 699 रुपये रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे.स्पर्धेसाठी अंतिम सामन्यातील सामनावीरास गोल्ड रिंग व टी शर्ट,स्पर्धेतील मालिकावीर,उत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज व क्षेत्ररक्षक यांच्यासाठी फास्ट ट्रॅक घड्याळे व टीशर्ट अशी भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील डे-नाईट सामन्यांचा शुभारंभ व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आम हसन मुश्रीफ,शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, खास.संभाजीराजे, खास.धनंजय महाडिक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यू ट्यूब वरून थेट प्रक्षेपण……..
भव्य स्पर्धा नियोजनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण यू ट्यूब चॅनेल वरून होणार आहे.त्यासाठी ड्रोन कॅमेरे व इतर सुसज्ज ऍडव्हान्स कॅमेरे या स्पर्धेची दृश्य घेण्यास तयार असणार आहेत.मैदानावरील पंचांच्या मदतीसाठी थर्ड अंपायर असणार आहेत त्यासाठी डीएसआर तंत्राचा वापर करण्यात येणार आहे.अशा प्रकारे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर असणारी जिल्ह्यातील ही पहिलीच क्रिकेट स्पर्धा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here