पाण्याच्या बादलीत पडून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

0

पाण्याच्या बादलीत पडून एका १४ महिन्याच्या चिमुरडीचा दुर्दयावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे . सांगलीच्या शामराव नगर मध्ये हा प्रकार घडला आहे .अलिना अमनगी असे या बलिकेचे नाव आहे .

सांगलीच्या शामरावनगर मध्ये मलिक अमनगी याच्या १४ महिन्याच्या चिमुरडी अलिना मलिक अमनगी रविवारी घरातील पाण्याच्या बादलीत पडून गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . अलिना याला तिच्या आईने कणीस खण्यासाठी दिले होते .ते कणीस खातखात अलिना ही घरात पाण्याने भरलेल्या बदली जवळ गेली .आणि यावेळी तिच्या हातातील कणीस पाण्याने भरलेल्या बादलीत पडला . यानंतर अलिना या चिमुरडीने पाण्याने भरलेला या बादलीतुन कणीस काढण्यासाठी बादली हात घातला आणि तिचा तोल गेला आणि ती पाण्याच्या बादलीत डोके खाली आणि वर पाय अश्या अवस्थेत पडली . आणि काही वेळातच अलिना हीच पाण्यात जीव गुदमरून मृत्यू झाला . मात्र यावेळी हा प्रकार होत असताना घरातील कोणाचेचं लक्ष गेले नव्हते . मात्र थोड्या वेळाने अलिना हिच्या कडे लक्ष गेले . आणि घरच्यांनी तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र , डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here