गोरक्षणाच्या नावा खाली सुरु असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीत  आंदोलन

0

देशात गोरक्षनाच्या नावाखाली कथित गोरक्षकांच्या कडून दलित आणि मुस्लिम युवकांच्या वर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सांगली मध्ये विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काळ्या फिती लावून भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

देशभर सद्या गोरक्षकांच्या नावाखाली गुंडगिरी करून कथित गोरक्षकांन कडून निष्पाप दलित व मुसलमान वर हल्ले केले जातात, या गुंडशाही विरोधात आज सांगलीमध्ये मानवतावादी सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांच्याकडून भाजप सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले, यावेळी आंदोलकांनी काळ्या फिती बांधून कथित गोरक्षक आणि सरकारच्या विरोधात निदर्शने केली .तसेच या कथित गोरक्षकांच्या वर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे, शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here