सांगली मध्ये ऊस दराचे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर , स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ६ ठिकाणच्या ऊस तोडी पाडल्या बंद

0

सरफराज सनदी

ऊस दरासाठी सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.आज जिल्ह्यात ६ ठिकाणी सुरु असलेल्या ऊस तोडी बंद पडत ऊस वाहतूक रोखली आहे.पलूस आणि वाळवा तालुक्यात मैदानात उतरत स्वाभिमानीने हे आंदोलन केले.३४०० रुपये पहिली उचल मिळाल्या शिवाय ऊसाला हात लावू देणार नाही.असा इशारा यावेळी दिला आहे.गली जिल्ह्यातील ऊस आंदोलन आता भडकत आहे .आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु केले आहे. पलूस आणि वाळवा तालुक्यात सुरु असलेल्या तोडी बंद पडल्या आहे .पलूस ,धनगाव , अंकलखोप , आमणापूर येथे सूर असलेल्या ऊस तोडीच्या ठिकाणी हल्लाबोल करत हातात उसाचे कांडे घेऊन ऊस मजुरांना यावेळी हुसकावून लावले .तसेच काही ठिकाणी उसाने भरून निघालेले ट्रकटर अडवून टायरची हवा सोडण्यात आली .या दोन्ही तालुक्यातील ऊस तोड हि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयंतराव पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या कारखान्यासाठी सुरु होती . राज्य सरकार कडून जो पर्यंत ऊसाला ३४०० रुपये पहिली उचल मिळत नाही.तो पर्यंत जिल्ह्यातील ऊस तोड होऊ देणार नाही आणि कोणत्याही साखर कारखान्याला ऊस जाऊ देणार नाही.अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीर केली आहे .यामुळे सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलनं भडकत आहे असे दिसून येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here