खासदार संभाजीराजेंनी तरुणांसोबत नदीत लुटला पोहण्याचा आनंद

0

चंदगड ( प्रतिनिधी ) : कोल्हापूरचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी गेलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज चंदगड तालुक्यात हिंडोल नदीत तरुणांसोबत पोहोण्याचा आनंद लुटला. खासदार संभाजीराजे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी चंदगड दौऱ्यावर आहेत.

त्यांना आज धलगरवाडी येथे रस्त्याकडेला असलेल्या नदीत पोहणारी मुले दिसली. राजेंनी गाडी थांबवली व पोहणाऱ्या मुलांकडे नजर फिरवली. संभाजीराजेंनी अंगावरील कपडे काढले व सुरक्षा रक्षक मनाई करत असतानाही त्यांनी पाण्यात सूर मारला.

खुद्द राजांना आपल्यामध्ये पाहून नदीत पोहत असलेल्या तरुणांना सुद्धा भरपूर आनंद झाला. त्यांनी सुद्धा राजेंसोबत पोहण्याचा आनंद मौजमजा करीत एकत्रित लुटला. नदीच्या थंडगार वाहत्या पाण्यात पोहून त्यांनी विरंगुळा मिळवण्याबरोबरच मुक्त जनतेसमवेत आनंद लुटला.

ते आज आपले राजेपण विसरुन जनतेत एकरुप होऊन गेले. ही ओढ त्यांना रयतेसमावेत थंडगार पाण्यात डुंबण्यापासून रोखू शकली नाही. मुलांनी ही संधी साधून संभाजीराजेंसोबत फोटो काढून घेण्याची संधी साधून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here