समरजितसिंह राजेंचें कार्य कौतुकास्पद : चंद्रकांत दादा पाटील

कागल औद्योगिक वसाहतीत महाआरोग्य शिबीर

0

वार्ताहर कसबा सांगाव :
आरोग्य सेवा हे पुण्याईचे काम आहे. कोणतेही राजकारण न करता ही वैद्यकीय सेवा कामगारच नव्हे तर ती सर्वांसाठी उपलब्ध आहे. अनेक कुटुंबे आजारपणामुळे आर्थिक संकटात सापडली आहेत. अशा कुटूंबांना आधार देण्याचे काम राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशनमार्फत सुरु आहे. हे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.
राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशन व मॅक यांच्या संयुक्त विद्यमाने कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांसाठी मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित केले होते. याप्रसंगी पुणे, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, मॅकचे अध्यक्ष हरिषचंद्र धोत्रे, नवोदिता घाटगे यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्याचे काम केले आहे. त्याचा लाभ लाखो लोकांना होत आहे. यापूर्वी अनेक गरीब कुटूंबातील सदस्यांना उपचार परवडत नाहीत म्हणून आपले जीव गमवावे लागत होते. मात्र आता पैसे नाहीत म्हणून कोणीही आरोग्यसेवेपासून वंचित राहणार नाहीत. समरजितसिंह घाटगे हे चांगले काम करीत आहेत. भविष्यात कागलला न्याय देणारे नेतृत्व त्यांच्या रूपाने पुढे आले आहे.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, ओद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीत कामगार हा नेहमीच महत्वाचा घटक आहे. त्यामुळे कामगारांचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. कोणतेही राजकारण न करता आम्ही आरोग्य सेवेचे काम अविरतपणे करत आहोत. कामगारांच्या काही अडचणी असल्यास सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शाहिद जवानांच्या कुटूंबियांमधील सदस्यांना औद्योगिक वसाहतींमध्ये नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल यासाठी आपण प्रयत्न करू. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच औद्योगिक क्षेत्र हे राजकारण विरहित चालले पाहिजे. आमच्या सर्व उपक्रमांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक हरिशचंद्र धोत्रे यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र मालूमल व शंतनू गायकवाड यांनी केले. आभार संजय पेंडसे यांनी मानले. कार्यक्रमास उद्योगपती रामप्रताप झंवर, अशोक दुधाने, मॅकचे उपाध्यक्ष गोरख माळी, डॉ. तेजपाल शहा, शाहू कारखान्याचे व्हा. चेअरमन एम.पी. पाटील, श्रीनिवास पाटील, कोल्हापूर इंजिनिर असोसिएशन अध्यक्ष नितीन वाडीकर, शिरोली मार्क अध्यक्ष राजू पाटील, लक्ष्मीदास पटेल, संजय शेटे, सचिन पाटील, योगेश कुलकर्णी, संगीत नलवडे, युवराज पाटील, अप्पासाहेब पाटील, बॉबी माने, असिफ मुल्ला यांच्यासह मॅकचे सर्व पदाधिकारी कामगार व त्यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदींसह हजारांवर लाभार्थी
या महाआरोग्य शिबिरात कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील नामांकित १७ हॉस्पिटलनी सहभाग नोंदविला होता. या शिबिरात कामगार व त्यांचे कुटूंबीय असे एकूण अडीच हजारहून अधिकजणांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here