सामानगड ते हासुरवाडी रस्त्याबाबत वन विभागाला निवेदन : संध्याताई कुपेकर

0

गडहिंग्लज : मारुती मंदिर सामानगड ते हासुरवाडी रस्त्याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी वन प्रकल्प विभागाचे विभागीय व्यवस्थापक डी. एम. जाधव यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे. या रस्त्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा असून रस्ता होणाच्या दृष्टीने वनविभागाकडून योग्य ती कार्यवाही अद्याप झालेली नाही. ही बाब या परिसरातील इतिहासप्रेमी जनतेला योग्य वाटत नाही. तरी सादर बाबतीत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा म्हणजे रस्ते कामासाठी पर्यटन विकास कार्यक्रमातून मंजूर असलेला २५ लाखाचा निधी विहित वेळेत खर्च करता येईल. अन्यथा परिसरातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here