साई इंटरनॅशनलचे स्नेहसंमेलन उत्साहात

0

गडहिंग्लज : येथील साई इंटरनॅशनल स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रांताधिकारी विजया पांगारकर उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन, सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्या स्वाती शिराळकर यांनी पाहुण्याची ओळख करून दिली. संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर नर्सरी ते अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. सूत्रसंचालन पराग कुलकर्णी यांनी तर विद्या मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास अजित जाधव, शिवराज पाटील, जि. प. सदस्या शिल्पा खोत, राजेंद्र तारळे, बाळासाहेब हिरेमठ, सुभाष पुजारी, संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरे, संचालिका शैलजा पाटील, लक्ष्मी घुगरे, टोबू थॉमस आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here