आजर्‍यातील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरामध्ये ‘साहित्य संगीत मैफल’

0

आजरा (प्रतिनिधी) :

जागतिक मराठी दिनानिमित्त येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे ‘ते राजहंस एक….’ या साहित्य संगीत मैफलीचे आयोजन आजरा महाविद्यालयाच्या कला व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले. या मैफलीची सुरुवात मराठी सारस्वत कुसुमाग्रज आणि पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगुळकर तसेच ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी काही मान्यवरांना गौरविण्यात आले.

यावेळी आजरा तालुक्यातील बेलेवाडी गावचे नवोदित साहित्यीक श्री नंदू साळोखे यांचा ग्रंथभेट देवून सत्कार करण्यात आला. तर आदर्श मराठी भाषा शिक्षक सौ. मनीषा सुतार, चंद्रकांत कदम, रवींद्र महापुरे, विलास गवारी, विजय केसरकर, विजय पोतदार, सलीम शेख, बाळासाहेब कांबळे, डॉ. आनंदा बल्लाळ यांचा तर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त बशीर मुल्ला, रमेश चव्हाण, सुनील कोंडुसकर, कृष्णा सावंत, विकास सुतार या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

मैफिलीची सुरुवात ग. दि. मा. च्या गीतरामायण मधील ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ या गीताने करण्यात आली. त्यानंतर पु. ल. व ग. दि. मा. यांचे चटकदार किस्से तर सुधीर फडके यांच्या ‘उठ पंढरीचा राजा, कानडा राजा पंढरीचा सारख्या भक्तिगीतांनी रंगात वाढवली. ‘बुगडी माझी सांडली ग’ या लावणीने मैफलीचा समारोप झाला.

प्रा. रमेश चव्हाण, नाझिया सोलापूरे, अभिजित पाटणे यांची स्वर साथ तर डॉ. अशोक बाचुळकर व डॉ. आनंद बल्लाळ यांनी मराठी साहित्यातील पु. ल. व ग. दि. मांच्या साहित्यीक योगदानीचा सफर घडवून आणली. डॉ. कृष्णा होरांबळे व अभिजित पाटणे यांनी संगीत साथ केली. वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. सुधीर मुंज यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी राजा शिरगुप्पे, सुभाष विभुते, वामन सामंत, आय. के. पाटील, रवी हुक्केरी, गीता पोतदार, सुरेखा भालेराव, नूरजहॉं सोलापूर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here