राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आम.हसन मुश्रीफ यांना मातृशोक

0

राष्ट्रवादीचे नेते आम.हसन मुश्रीफ यांना मातृशोक
मुरगूड प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मातोश्री श्रीमती सकिनाबी मियालाल मुश्रीफ वय 92 यांचे आज सकाळी कागल येथील निवासस्थानी निधन झाले आहे.आज शुक्रवार दि 11 जानेवारी रोजी सांयकाळी पाच वाजता कागल येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले व तीन मुली सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.निवृत्त पोलीस कमिशनर शमशुद्दीन मुश्रीफ, माजी मंत्री आम.हसन मुश्रीफ आणि कागलचे माजी नगरसेवक अन्वर मुश्रीफ, मुली श्रीमती अमाबी बाबासो मुजावर (कोल्हापूर) सौ.खुर्षद मिरमहंमद मुजावर (कोल्हापूर)आणि सौ.अमेला कमरुद्दीन शरीफमसलत (मिरज) यांच्या त्या मातोश्री होत.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश उपाध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या आजी होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here