अारटीओ अधिका-याने केली अभिनेत्रीला अश्लील कमेंट

टीव्ही कलाकार शिखा सिंगला आरटीओ अधिका-याची अश्लील कमेंट

0

प्रतिनिधी : शशांक पाटील

मुंबई : सोशल मिडियाचा फटका कधी कोणाला कसा बसेल हे सांगता येत नाही. आज काल टीव्ही कलाकार सोशल साईट्सचा वापर अधिक करताना दिसतात. त्यांना या साईट्सवरती अपडेट राहने तेवढेच गरजेचे देखील असते. मात्र कधी कधी याचाच फटका त्या कलाकारांना बसल्याचे आपण पाहिले आहे.

टीव्ही कलाकार शिखा सिंगनेसुध्दा इंस्टाग्रामवर आपला फोटो पोस्ट केला आणि तिला या सोशल माध्यामात चुकीच्या कमेंट दिल्या गेल्या. शिखा सिंगने पोस्ट केलेल्या फोटोला पाहत एका आरटीओ अधिका-यानेच अश्लिल कमेंट केलीय. त्याने तिला हॉट बिकीनीमधले फोटोे शेअर करा अशी कमेंट केली.

या कमेंटमुळे शिखाची  चांगलीच चिडचिड झाली. कमेंट करणारा व्यक्ती दुसरा कोणी नसून पोलिसच असल्याने तिनं आश्चर्य व्यक्त केलं. आणि त्याला लाज वाटू द्या असा रिप्लाय दिला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here