‘ रुपसंगम किड्स जंगल ‘ कापड दालनाचे कोवाडमध्ये भव्य उदघाटन

0

कोवाड (प्रतिनिधी) : येथील रुपसंगम स्वस्तम साडी डेपोमध्ये किड्स रेडिमेड विभागाची ‘ रुपसंगम किड्स जंगल ‘ या नूतन कापड दालनाची सुरुवात झाली. महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापन ऋषिकेश घोरपडे यांच्या हस्ते उदघाटन झाले. कबड्डीपटू सुरज देसाई यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण झाले. या वेळी जनता बँकेचे व्यावस्थापक मच्छिद्र देसाई,दयानंद लांडे अशोक पाटील, सचिन पाटील उपस्थित होते.
‘ रुपसंगम ‘ चे मालक दयानंद सलाम यांनी सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले, “बालगोपालांसाठी रुपसंगम किड्स जंगल सुरु केले आहे. खरेदी महोत्सव २०१९ अंतर्गत आजपासून भव्य बक्षीस योजना सुरु केली आहे. दहा हजार खरेदीवर कूपनमधून लाखोंचे बक्षिसे दिली जाणार आहेत. यात हिरो डीलक्स गाडी, सोन्याचा नेकलेस, वॉशिंग मशिन, फ्रीज, एल.ई.डी. टीव्ही, मोटारसायकल, पैठणी अशी २५० बक्षिसे आहेत. नवीन कापड दालनाच्या निमित्ताने ही बक्षिस योजना सुरु केली आहे.” या वेळी रमेश डोंगरे, गुलाब पाटील, शशिकांत खोराटे, जोतिबा पाटील,विनायक पोटेकर, बाळासाहेब पाटील, राज हाल्याळी, दशरथ भिकले, व्यापारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here