चंदगड (प्रतिनिधी) :
कोवाड (ता. चंदगड) येथे कार्यरत असलेले व कापड व्यवसायातील एक अग्रगण्य नाव “रूपसंगम” परिवाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आतापर्यंत महिला व पुरूष वर्गामध्ये पसंती असलेल्या रूपसंगम वस्त्रदालन आता लहान मुलामुलींच्या कपड्याच्या दालनास सुरूवात करित आहे.
अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या रूपसंगम स्वस्तम साडी डेपो या शोरूममध्ये लहान मुलामुलींचे ड्रेस व लेडीज ड्रेसचे नविन दालन “रूपसंगम किड्स जंगल” या नावाचे अद्यावत दालन शुक्रवार दि. १ फेब्रूवारी रोजी सुरू होत आहे. या नविन दालनाचे उद्घाटन बँक आँफ महाराष्ट्रच्या कोवाड शाखेचे शाखाधिकारी ऋषिकेश घोरपडे यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम कोवाड येथे दुपारी १२.१५ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शोरूमचे दयानंद सलाम यांनी केले आहे.