सदोष रस्ता दुरुस्ती उठतेय प्रवाशांच्या जीवावर:भारिप बहुजन महासंघाचे निवेदन

0

मुदाळतिट्टा-निपाणी रस्त्यावरील खड्डे लोकांच्या जीवावर उठणारे
चुकीच्या पद्धतीने रस्ते दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा आंदोलन छेडू: भारिप बहुजन महासंघ

मुरगुड प्रतिनिधी
मुदाळतिट्टा -मुरगुड-निपाणी रस्ता खड्ड्यानी भरला आहे. गेल्या महिन्यात रस्ता दुरुस्तीचे काम चुकीच्या पद्धतीने व घाईत उरकण्यात आलेआहे. केमिकल मिश्रित हलक्या प्रतीच्या डामराचा वापर करण्यात आला असल्याचा संशय आहे. अत्यंत रहदारीच्या या रस्तावर हजारो प्रवासी दर तासाला प्रवास करतात अशा रस्त्यावर अपघात झाला तर त्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार जबाबदार राहतील अशी बोगस कामे करणाऱ्या ठेकेदारांची लायसन्स रद्द करावीत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी खड्यांची पाहणी करून परत रस्ता दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने कागल तालुका अध्यक्ष बाळासो भरमा कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटल्या प्रमाणे,मुदाळ तिट्टा-निपाणी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. गेल्या महिन्यात हे खड्डे भरण्याचे काम करताना खड्ड्यातील डस्ट साफ करणे आवश्यक होते शिवाय त्यातील मुरूम दगड न काढता खड्डे भरले गेले आहेत. त्यामुळे खड्यातील डांबर आणि खडी निघून रस्त्यावर पसरली आहे.या कामावर बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांचे लक्ष नव्हते.अशा प्रकारे सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू असून दुर्दैवाने अपघात झाला तर त्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असतील.

यमगे : मुधाळतिट्टा-निपाणी रोड वरील यमगे गावाजवळील खड्डयाची भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली यावेळी भारीपचे कागल तालुका अध्यक्ष, बाळासो कांबळे,संतोष गायकवाड़,स्मिता कांबळे,यशोदा कांबळे,केरबा कांबळे, सुनिल कांबळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here