शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकीच्या मतमोजणीची दि. २० नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ९.०० वा. सुरू झालेली कार्यवाही आज सकाळी ८.०५ वा. संपली. सुमारे २३ तासांहून अधिक काळ चाललेल्या या मतमोजणीदरम्यान सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि सर्वच संबंधित घटकांनी यावेळी शांतता, संयम बाळगून जे सहकार्य केले, त्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत व अभिनंदन केले आहे.

काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत जाहीर झालेल्या विविध निकालांमधील विजयी उमेदवारांचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र. उमेदवाराचे नाव अंतिम प्राप्त मते (कंसात फेरी)
अधिसभा- महाविद्यालयीन शिक्षक (५ खुली पदे)
१. पाटील अशोककुमार बापूराव ५२२ (चौथी)
२. पाटील अरूण ए. ५५६ (सहावी)
३. गुजर मनोज दशरथ ४९४ (सातवी)
४. घाटगे सतीश रामचंद्र ५१५ (नववी)
५. पाटील वसंत मारुती ४४५ (नववी)
अधिसभा- महाविद्यालयीन शिक्षक (महिला १ पद)
१. श्रीमती जोगी आय.डी. १६९५ (पहिली)
अधिसभा- महाविद्यालयीन शिक्षक (एस.सी. १ पद)
१. खंदारे नीळकंठ काशीनाथ १४६१ (पहिली)
अधिसभा- महाविद्यालयीन शिक्षक (एस.टी. १ पद)
१. श्रीमती निकम अलका देविदास १७०७ (पहिली)
अधिसभा- महाविद्यालयीन शिक्षक (डी.टी.एन.टी. १ पद)
१. थोरात राजेंद्र रामचंद्र १३६६ (तिसरी)
अधिसभा- नोंदणीकृत पदवीधर (५ खुली पदे)
१. जाधव संजय पांडुरंग १२७४ (पहिली)
२. चौगुले मल्लाप्पा लगमणा १०६३ (पहिली)
३. मेहता पंकज पदमचंद ११६१ (दुसरी)
४. पाटील मधुकर मुकुंद ११२४ (सातवी)
५. गायकवाड श्रीनिवास बाळासाहेब १००९ (सातवी)
अधिसभा- नोंदणीकृत पदवीधर (महिला १ पद)
१. शिंदे आरती प्रभाकर ४८७९ (पहिली)
अधिसभा- नोंदणीकृत पदवीधर (डी.टी.एन.टी. १ पद)
१. राजपूत अमरसिंह चंदरसिंग ५०६३ (पहिली)
अधिसभा- नोंदणीकृत पदवीधर (ओबीसी १ पद)
१. जंगम दिनेश गंगाधर ४८७९ (पहिली)
विद्यापरिषदेवर प्रत्येक विद्याशाखेमधून निवडून द्यावयाच्या दोन शिक्षकासाठी एकूण पाच गटांतून उमेदवार उभे होते. त्याचे निकाल खालीलप्रमाणे-
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा (खुला प्रवर्ग- १ पद)
१. दगडे दिलीप हनुमंत १९२७ (पहिली)
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा (एस.सी. १ पद)
१. वासंबेकर प्रमोद निवृत्ती १८९२ (पहिली)
वाणिज्य विद्याशाखा (खुले १ पद)
१. कोरबू रसूल गफूर १८०४ (पहिली)
मानव्यविद्या विद्याशाखा (खुले १ पद)
१. सावंत सुनील रघुनाथ १७०५ (पहिली)
आंतरविद्याशाखा (खुले १ पद)
१. पाटणकर प्रतिभा सुभाषचंद्र १८६६ (पहिली)

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here