ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार – दादाजी भुसे

शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठकित घेतला निर्णय

0

मालेगाव : राज्यातील ग्रामीण भागातील निवासी कारणासाठी झालेली अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, याचा फायदा गरीब-दुर्बल घटकांना होण्यासाठी तातडीने अंमलबजावणी करावी, अशा सूचना ग्राम विकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

राज्यमंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे याबाबत आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी राज्यमंत्री श्री.भुसे म्हणाले, या निर्णयाचा फायदा गरीब-दुर्बल घटकांना होण्यासाठी मिशन मोड म्हणून काम करणे गरजेचे आहे. महसूल, ग्रामविकास विभाग यांच्यामार्फत निवासी जागा नावावर होण्यासाठी पंचायत समितीद्वारे लवकरच पथके नेमली जातील. या कामाला प्राधान्यक्रम देऊन शक्यतो महाराष्ट्र दिनी त्यांच्या नावाचा उतारा त्यांना देण्याचा प्रयत्न राहील. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी विविध शासकीय अधिकाऱ्यांना श्री.भुसे यांनी बैठकीत दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here