संशोधक म्हणतात चहा पिणारे जास्त स्पष्ट आणि सृजनशील

0

हे वाचून तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल तर आपण नक्कीच चहाबाज आहात. भारत हा सर्वाधिक चहाबाजांचा देश आहे आणि चहा पिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे चीनची राजधानी बिजिंगमधील पेकिंग विद्यापिठात एका अभ्यासानंतर हा निष्कर्ष अभ्यासकांनी मांडला आहे.कि चहा प्यायल्याने एकाग्रता वाढते ज्यामुळे मनामधील अनेक गोष्टींबद्दलचे विचार अधिक स्पष्ट होतात, चहामधील कॅफीन आणि थेनीन या घटकांमुळे व्यक्ती सतर्क आणि सजग राहतो असं म्हटलं आहे. चहामधील कॅफीन आणि थेनीनचा मेंदूमधील क्रिएटीव्ह विचारशक्तीशी असण्याचा संबंध यामध्ये मांडला आहे. चहा प्यायलानंतर लगेचच व्यक्तीच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना जन्म घेतात असंही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
या अभ्यासाअंतर्गत मानसोपचारतज्ञांनी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये ५० विद्यार्थ्यांच्या मदतीने काही प्रयोग करून हा निष्कर्ष मांडला. एखादी व्यक्ती दिवसभरामध्ये कितीवेळा चहा पिते यावर तिचे विचार आणि सृजनशीलता ठरते असे त्यात म्हटले आहे.चहाचा विचारशक्तीवर कसा परिणाम होतो यासंदर्भात हे संशोधन करण्यात आले आहे. या अभ्यासामुळे मानवी आकलनशक्ती आणि अन्नपदार्थांमधील संबंधांसंदर्भातील अभ्यासासाठी याची मदत होईल आणि आपण ज्या गोष्टींचे सेवन करतो त्या गोष्टींचा आपल्या विचारशक्तीवर कसा परिणाम होतो हे समजून घेणे शक्य होणार आहे.
या अभ्यासामधील सर्व निष्कर्ष ‘फूड क्वॉलिटी अॅण्ड प्रेफरन्स जर्नल’मधील एका विशेष लेखामध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. चहाचे अतिसेवन धोक्याचे आहे असेही या अहवालात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here