ताई, आमच्या केळीला भाव मिळवून द्या ना..

शेतकऱ्याच्या छोट्याश्या मुलीची सुप्रिया सुळेंना आर्त हाक

0

प्रतिनिधी- अभयकुमार देशमुख

जळगाव – ताई , आमचे पप्पा खुप मेहनत करुन केळी पिकवतात. पण केळीला भाव नसल्यामुळे ते चिंतेत आहेत. माझ्यासोबत खेळत नाही. ताई तुम्ही काहीतरी करा पण आमच्या केळीला भाव मिळवून द्या, अशी आर्त हाक चौथीत शिकणार्‍या राजश्री देवानंद पाटील या चिमुकलीने आज खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे करत आपल्या शेतातील केळी ताईंना भेट दिली.

या विनंतीवर तिची समजूत काढताना सुप्रिया यांनी, आमचे नेते विधीमंडळात याबाबतीत आवाज उचलतील असे आश्वासन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सध्या उत्तर महाराष्ट्रात सुरु असून आज रावेर येथील सभेला राष्ट्रवादीचे नेते जळगाव हून रावेर साठी निघाले होते. वाटते निंबोरा या गावात देवानंद पाटील यांची केळीची बागेला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट दिली.

यावेळी शेतकरी देवानंद पाटील म्हणाले की, “सध्या केळीला ७०० प्रति क्विंटल भाव मिळत आहे. आघाडी सरकारच्या काळात १००० ते १२०० भाव मिळत होता. करपा रोगाने यंदा केळीचे मोठे नुकसान केले असून त्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही. पिक विमा मिळायलाही अडचण येत आहे. त्यातच वीज बिल भरमसाठ आल्यामुळे ते भरले जात नाहीत. कर्जमाफी तर दुरच राहिली.”
यावर तेथील तमाम नेत्यांनी त्यांची समजूत काढली आणि लवकरच तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here