प्रजासत्ताक दिनाचा लेखाजोखा

0

श्रीधर मांगले :
भारतीय प्रजासत्ताकाच्या ६९ वा वर्धापनदिन आज आपण साजरा करीत आहोत. सर्वच भारतीयांच्या दृष्टीने हा अभिमानाचा दिवस आहे. गेल्या ७ दशकात भारताने सर्वव्यापी यश मिळवले आहे. आज भारत जगात महासत्ता बनवण्याच्या टप्प्यावर पोहचला आहे. भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी उद्योग, पाणी व्यवस्थापन, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्वाची नवी शिखरे निर्माण केली आहेत. पण आजच्या प्रसारमाध्यमातून आपला T R P वाढवण्यासाठी प्रजासत्ताक भारताने कमावलेले यश झोकाळले जाताना दिसते. वतर्मानपत्रे किंवा टी. व्ही. चॅनेल्सवर देशातील घोटाळे, भ्रस्टाचार, टोळोयुद्ध खंडणी, दरोडा, अपहरण, खून, बलात्कार, अत्याचार, अपघात असे विषय प्रकर्षाने मांडले जातात, चर्चेला जातात. मनं उध्वीग्न होतात. आपण ही परिस्थिती पाहतोय, म्हणून भारतीय प्रजासत्ताकाच्या ७० व्या समारंभ दिनी भारताने केलेल्या विधायक प्रगतीबद्दल मी लिहणार आहे.
स्वतंत्र भारताला १७ वर्षे पंतप्रधान लाभलेले पंडीत नेहरू यांनी देशासाठी भरीव स्वरूपाचे कार्य केले. नेहरूजी पहिल्या तीन पंचवार्षिक योजना शेती व उद्योगधंद्यांचा विकास यासाठी यशस्वीपणे राबविल्या. उद्योगासाठी वीज हवी म्हणून भाक्रा नानगल, कोयना, हिराकूड, अर्जुनसागर अशी प्रचंड धरणे बांधली. लोखंड पोलादाचे कारखाने उभे केले. रासायनिक खते, रसायने, जहाजबांधणी, रेल्वे इंजिने डबे यांचे मोढाले कारखाने उभे केले. प्रतिभासंपन्न डॉ. होमी भाभा यांच्या सहकार्यातून भारतात विज्ञानाचा पाय घातला. टाटा इन्सिट्यूट ही संस्था स्थापन केली. अण्वस्त्रे व अणुऊर्जा या क्षेत्रात एक अमेरिका वगळता सर्वच देशांची पाटी कोरी होती. पण १९५३ मध्ये अणुऊर्ज आयोगाची स्थापना करून अणुऊर्जा निर्मितीचे तंत्रज्ञान अवगत केले. १९७४ मध्ये भारताने राजस्थानातील पोखरण येथील वाळवंटात पहिली भूगर्भिय अणुस्फोट चाचणी घेतली व भारत अणुबॉम्ब बनवू शकतो हे साऱ्या जगाला दाखवून दिले.
भारताने अवकाश संशोधनातही गरुडझेप घेतली. आपला स्वतःचा उपग्रह अवकाशात असणारी जगात अवधी पाच राष्ट्रे होती. डॉ. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली आपला देशाचा उपग्रह सोडून आघाडी मारली. तसेच या उपग्रहांनी घेतलेला वेध किंवा चित्रे यांचा उपयोग जसाच्या तास होत नाही, त्यांच्या अर्थ लावला लागतो. या तंत्रज्ञानातही भारताने आघाडी मारली आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीला जगातील टोमॅटोच्या पिकाचा अंदाज हवा होता तेव्हा आपले भारतीय तंत्रज्ञानच उपयोगी पडले. यामध्ये लक्षणीय बाब म्हणजे हे तंत्रज्ञान कोणीही विकत नाही, उसने किंवा भाड्याने देत नाही. ते ज्याचे त्यानेच विकसित करायचे असते.
ज्यावेळी भारताकडे सुरप कॉम्पुटर किंवा क्रायोजेनिक इंजिन तयार करण्याचे तंत्रज्ञान नव्हते. ते मिळवण्यासाठी खूप वेळ लागणार होता. भारताने अमेरिकेकडे या तंत्रज्ञानाची मागणी केली. अमेरिकेने नकार दिलाच शिवाय रशियाला तंबी दिली की भारताला हे तंत्रज्ञान द्याल तर तुम्हाला गहू देणार नाही. भारतीय तंत्रज्ञानी हे आव्हान स्वीकारले व पुण्याच्या सी-डॅक संस्थेत क्रायोजेनिक इंजिन बनवले. ते अमेरिकेच्या ७०% किंमतीत झाले आहे.
भारतने जीवशास्त्रातही मौलिक संशीधन केले आहे. संकरित बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर करून हरितक्रांती केली. भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला आहे.
उत्तम गाई – म्हैशींची संकरित पैदास करून धवलक्रांती घडवली आहे. दुधाचा महापूर आणला आहे.
प्रजासत्ताक देशाची प्रगती होत आहेच मात्र काही क्षेत्रात इथला भारतीय समाधानी दिसत नाही. भारताची ८०% लोकसंख्या खेड्यात आहे, ते शेतकरी उदरनिर्वाह करतात. त्यांच्या अन्नधान्याच्या मातीमोल किंमत मिळते. दुधाचा महापूर वाहतोय, पण त्यातलं एक वाटीभर दूध शेतकरी मुलाला देऊ शकत नाही. महागाई वाढत आहे. आरक्षणाची समस्या आ s s वासून उभी आहे. जातीपातीच्या भिंती पडण्याऐवजी भकूम होताना दिसत आहेत. गावठी दारूला पर्याय म्हणून देशी दारू , जुगाराला पर्याय म्हणून महाराष्ट्र राज्य लॉटरी, डान्सबारला पुन्हा परवानगी मिळते आहे. गावातील साध्यग्रामसेवकापासून पंतप्रधान पदापर्यंतच्या व्यक्ती घोटाळ्यात सामील असताना दिसत आहेत. जगातील बहुसंख्य असलेल्या तरुणांचा हा भारत देश बेकरीत व्यसनाधीन होऊन मरतो आहे. गुटखा खाऊन झटके देतो आहे. ‘पब’ मध्ये झिंगतो आहे.
भारत एक महासत्ता बनवायचा असेल तर संविधानात विचारपूर्वक बदल करून तरुण पिढीला देशकार्यात उपयोग करून घ्यावा लागेल. भ्रस्टाचारमुक्त भारत करण्यासाठी सर्वानीच प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. वृतपत्र केवळ माहितीचे संकलन असत नाही, ते केवळ बातम्या देण्याचे साधन नाही, तर या माध्यमातून देश विधायक वाटेवर आणण्यासाठी दिशा दिली जाऊ शकते. या माध्यमातून भारतीय तरुणांची मतमतांतरे आणि त्यांच्या आशा आकांक्षा स्पष्ट होणार आहेत. होऊ व्यातलेल्या लोकसभेच्या निवडणुकात स्वच्छ नेतृत्वाला संधी देण्याची गरज आहे. येणारे सरकार देशाचे भविष्य घडवायचे की बिघाडावयाचे ते ठरवणार आहे. देशउन्नतीसाठी धडपडणाऱ्या न्युजटेल टीमला शुभेच्छा !

श्रीधर मांगले
( जाधेवाडी ता.आजरा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here