न्यू इंग्लिश स्कूल कौलगेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0

कौलगे (गडहिंग्लज) : येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्यावतीने २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन व विविध स्तरातील मान्यवरांचा, विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व पाहुण्यांचे स्वागत विश्वजित चव्हाण यांनी केले , मा.मुख्याध्यापक श्री. एकनाथ देसाई यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. प्रजासत्ताकच्या या कार्यक्रमात एम.सी.सी च्या विद्यार्थ्यानी संचलन केले. तसेच नामदेव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुलांनी उत्कृष्ठ लेझीम व झांज चे सादरीकरण केले .
शाळेच्या नुतन मुख्याध्यापकपदी नियुक्ती झालेले श्री.एकनाथ देसाई यांचा तसेच गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री राजाराम पोवार यांचा तसेच चित्रकला परीक्षेचा निकाल १०० टक्के आणण्यासाठी ज्यांचे मार्गदर्शन लाभले ते शिक्षक श्री. दिपक सावंत यांचाही सत्कार करण्यात आला . इंटरमिजीएट परीक्षेत अ ग्रेड संपादन केलेबद्दल कु.दिया दावणे व कु.प्रथम वागणेकर या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.


यावेेेळी कौलगे गावचे सरपंच , ग्रामपंचायत सदस्य , विविध संस्थांचे व गावातील तरूण मंडळाचे पदाधिकारी , ग्रामस्थ , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री . अरूण यसरे यांनी केले व आभार श्री. एकनाथ देसाई यांनी मानले .

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here