आदित्य ठाकरेंच्या हस्ते रेडेकर फार्मसी काॅलेजचे लोकार्पण

0

नेसरी (प्रतिनिधी) :
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे दोन दिवसाच्या कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर आहेत. मंगळवारी या दौर्‍यावेळी युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंत रेडेकर फार्मसी कॉलेज नेसरीचे भव्य दिव्य उदघाटन सोहळा पार पडला.

आदित्य ठाकरे यांच्या धावत्या दौऱ्यात त्यांनी दुपारी यशवंत रेडेकर फार्मसी कॉलेज चे उदघाटन केले. या वेळी संस्थेचे संस्थापक व शिवसेनेचे नेते रियाजभाई शमनजी यांच्याकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी सर्वात प्रथम रियाजभाई यांचे त्यांच्या शुभहस्ते उद्घाटन केल्याबद्दल आभार मानले. तसेच रियाजभाई हे एक पुण्याचे काम करत आहेत. शिक्षण देणे किंवा शिक्षण समूह उपलब्ध करून देणे म्हणजे खूप मोठे मोलाचे कार्य आहे. त्यानंतर महाविद्यालय विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. यावेळी आदित्य ठाकरेंनी आजच्या या स्पर्धेच्या युगात मुला मुलींसाठी शिक्षण किती महत्वाचे आहे हे सांगितले. व प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित करून त्यानुसार वाटचाल करावी. शिवसेना आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे एक अतूट नाते आहे. जेंव्हा जेंव्हा विध्यार्थ्यांना गरज पडते तेंव्हा तेंव्हा सेना त्यांच्या पाठीशी उभी असते, मग ते अॅडमिशन असूदे,पार्किंगची समस्या असुदे तसेच इतर काही समस्या तसेच स्वप्न बघताना ती मोठी स्वप्न बघा आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचे असतो तो आत्मविश्वास, आत्मविश्वास असेल तरच तुम्ही गरुडझेप घेऊ शकता आणि तुमच्या पंखांना बळ देण्याचे काम शिवसेना सदैव करत राहील.
त्याआधी संस्थेचे संस्थापक रियाजभाई शमनजी यांनी हिंदूहृदयसम्राट कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनने मुंबई ते कोल्हापूर पर्यंत आपल्या शिवसेनेच्या यशाची प्रशंसा केली. २००६ पासून त्यांनी ज्योतिर्लिंग शिक्षण समूहची स्थापना केली व यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मोलाचा हात आहे असे ते म्हणाले.
यावेळी मंचावर संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवाडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संघटन संग्रामसिंह कुपेकर, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, सहसंर्पक प्रमुख प्रा.सुनिल शिंत्रे, प्रतीक क्षीरसागर व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here