अवघ्या 193 रुपयात रोज 1GB डेटा – आता अनिल अंबानींची ऑफर

0

दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या डेटा स्पर्धेमध्ये आता आरकॉमने प्रीपेड ग्राहकांसाठी खास 193 रुपयांचा प्लॅन आणला आहे. रिलायन्स जिओला हा प्लॅन टक्कर देणार आहे.

या प्लॅनमध्ये आरकॉमच्या ग्राहकांना 193 रुपयांमध्ये 28 दिवस दररोज 1GB 2G/3G/4G डेटा मिळेल. तर व्हॉईस कॉलिंगसाठी दररोज एसटीडी आणि लोकल 30 मिनिटे मिळणार आहेत.

रिलायन्स जिओने डेटा दर स्वस्त करण्याची स्पर्धा सुरु केली आहे. आयडिया, एअरटेल आणि व्होडाफोन या सर्वच आघाडीच्या कंपन्यांची ग्राहकांना एकमेकांपेक्षा स्वस्त प्लॅन देण्याची चढाओढ सुरु आहे. त्यात आता आरकॉमनेही उडी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here