रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर; कर्जे होणार स्वस्त शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जाच्या मर्यादेत ८० हजार रुपयांची वाढ

0

 रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर झाले असून  रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर ६.२५ टक्के तर रिव्हर्स रेपो दर ६ टक्के झाला आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे दर कमी होणार आहेत. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत ही घोषणा केली.

या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होणार आहेत.  यामुळे  सध्या सुरु असलेल्या कर्जांवरील व्याजदरही कमी होणार असल्याने बँकेचा हप्ताही कमी होणार आहे.तसेच शेतकऱ्यांसाठी  बिनव्याजी कर्जाच्या रकमेत सुमारे ६० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी  कर्जाची मर्यादा १ लाख ६० हजार रुपये झाली आहे.

दरम्यान, यंदाच्या २०१९-२०च्या आर्थिक वर्षात जीडीपीचा दर हा ७.४ राहण्याची शक्यता आरबीआयने वर्तवली आहे. त्याचबरोबर महागाईचा दर ३.२ टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here