वर्ल्डकपसाठीच्या संघात निवड झाल्यानंतर चार तासांत रवींद्र जडेजाचा भाजपाला पाठिंबा जाहीर

0

 

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरल्यानंतरही अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजाची पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक 2019 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. जडेजाच्या निवडीनंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. परंतु विश्वचषकासाठीच्या संघात निवड झाल्यानंतर अवघ्या चार तासात रवींद्र जडेजाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. जडेजाने भाजपला पाठिंबा घोषित केल्यानंतर जडेजाच्या या निवडीमागे भाजप कनेक्शन आहे का? असा सवाल अनेक क्रीडारसिंकांनी उपस्थित केला आहे.

याआधी अष्टपैलू क्रिकेटर म्हणून रवींद्र जडेजाने चांगेल प्रदर्शन केले आहे. परंतु जडेजा गेल्या वर्षभरापासून आऊट ऑफ फॉर्म आहे, अशी त्याच्यावर टीका होत आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वीच्या अखेरच्या वन डे मालिकेतही त्याला संघातून वगळण्यात आले होते. परंतु हार्दिक पंड्यानं माघार घेतल्यामुळे जडेजाला संधी देण्यात आली. त्याला तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यामध्येही त्याने क्रिकेटरसिकांना नाराज केले होते. त्यामुळे जडेजाची निवड सर्वांसाठी आश्चर्यकारक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here