विचारवंतांची मांदियाळी म्हणजेच रवळनाथ सोसायटी

0

गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) :
सामाजिक बांधिलकी मानून काम करणारी श्री रवळनाथ को. ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीमध्ये अनेक अनमोल माणस आहेत. किंबहुना विचारवंतांची मांदियाळी असणारी ही सर्व माणसं म्हणजे संस्थेची कवचकुंडलं आहेत. असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी काढले.
रवळनाथ को. ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे आयोजित समारंभात ते बोलत होते. संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव प्राचार्य डॉ. बी.एम. हिर्डेकर, प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशपांडे प्रमुख उपस्थित होते. सेवानिवृत्तीबद्दल कमला कॉलेजचे प्राचार्य डॉ. जे.बी. पाटील, चार्टर्ड अकौंटंट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल शुभम हरगुडे आंतरराष्ट्रीय नेमबाजीत चमकदार कामगिरी केल्याबद्दल अनुष्का पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. हिर्डेकर, प्राचार्य डॉ. देशपांडे, विजया पाटील, अनुष्का पाटील, शुभम हरगुडे यांची मनोगते झाली. सत्कारमूर्तींनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शाखा चेअरमन प्रा. आर. एस. पाटील यांनी स्वागत केले. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी प्रास्ताविक केले. शाखा सल्लागार प्रा. वर्षा मैंदगी यांनी आभार मानले. कार्यक्रमास मुख्य कार्यालय संचालक प्रदीप अभ्यंकर, शाखा सल्लागार अमृत सुतार, आण्णासाहेब कलगोंडे, विजय हरगुडे, प्रा. रवींद्र पोर्लेकर, सुधाकर गोखले, शाखाधिकारी पंकज कुंभार यांच्यसह ठेवीदार, सभासद, कर्जदार व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here