राष्ट्रवादीच्या महिला देणार भाजप सरकारला घुंगरु भेट

0

जळगाव (प्रतिनिधी) :

राज्यात डान्सबार पुन्हा सुरु करणार्‍या भाजप सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांकडून घुंगरु भेट देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजप सरकारने डान्स बार पुन्हा सुरु करण्याचा जो निर्णय घेतला त्याविरोधात सध्या राज्यात महिला वर्गातून संतापाची लाट उसळली आहे.

याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रचंड आक्रमक झाल्या असून जळगावच्या पत्रकार परिषदेत हे घुंगरु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्कालिन गृहमंत्री आर. आर. आबांनी डान्सबार बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. परंतु या डान्सबार बंदीबाबत सरकारला न्यायालयात भक्कम बाजु मांडता आली नाही. त्यामुळे न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवली असा आरोपही राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here