राष्ट्रवादीतर्फे कोल्हापूरातून धनंजय महाडिक; लोकसभेसाठी राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

0

मुंबई (प्रतिनिधी) :

लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी गुरूवारी जाहीर झाली. पत्रकार परिषदेत हि यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापूरातून विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर ह‍ातकणंगलेमध्ये स्वाभीमानी शेतकरी संघटनेला म्हणजे खा. राजू शेट्टी यांना पाठींबा देण्यात आला आहे. त्याचबरोबर या यादीत सुप्रिया सुळे, उदयनराजे, सुनिल तटकरे यांचा समावेश आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नवाब मलिक, हेमंत टकले उपस्थित होते. ही पहिली यादी असून उर्वरित यादी शुक्रवार आणि शनिवारी घोषित करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेत मावळ, माढा, अहमदनगर येथील उमेदवारांची घोषणा मात्र झालेली नाही. काही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अदलाबदली करण्याचे चालले आहे, त्यावर चर्चा सुरु असल्याचे देखील ते म्हणाले.

या यादीमध्ये महाराष्ट्रातील १० आणि लक्षद्वीपमधील १ अशा ११ नावांची घोषणा करण्यात आली आहे. हातकणंगले लोकसभाची जागा स्वाभीमानी संघटनेसाठी सोडली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ

मुंबई उत्तर पूर्व : संजय दीना पाटील
बारामती : सुप्रिया सुळे
बुलडाणा : राजेंद्र शिंगणे
सातारा : छत्रपती उदयनराजे भोसले
कोल्हापूर : धनंजय महाडिक
जळगाव : गुलाबराव देवकर
रायगड : सुनील तटकरे
ठाणे : आनंद परांजपे
परभणी : राजे विटेकर
कल्याण : बाबाजी पाटील
लक्षद्वीप : मोहम्मद फैजल

हातकणंगले : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here