बोलीभाषा काव्याचा आत्मा : कवी रवी पाटील

2

बेळगांव (प्रतिनिधी) :

कविता ही समाज मनाचा आरसा आहे. अनेक बोलीभाषांतून विविध विषयांना सामावणारं, लोकांशी थेट आणि जवळचा संवाद साधणारं लिखाण झालं आहे. महाराष्ट्रात बोलल्या जाणार्‍या बोलीभाषेत कविता, गझल, चारोळ्या इत्यादी विविध काव्यप्रकार रचणं अपेक्षित आहे. बोलीभाषांचं माधुर्य सर्वांसमोर यावं, हा चर्चासत्राचा प्रयत्न आहे. बोलीभाषा ही काव्याचा आत्मा आहे. विविध ढंगातील बोलीची तऱ्हा व अदा न्यारी असते. बोलीचा सुंगध काव्याच्या रूपाने नवोदित कवीनी मांडाव्यात. असे प्रतिपादन सीमाभागातील कवी रवी पाटील केले. सवित्रीबाई फुले विद्यापिठ पुणे व शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापूर -भोर यांच्या संयुक्त विद्यमाने “बदलते सांस्कृतिक पर्यावरण व मराठी कविता ” या दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्रात सत्राध्यक्ष बेळगांवचे रवी पाटील म्हणून निमंत्रीत होते.

सीमाभागातील व्यथा, वेदनांचा हुंकार व सीमाभागातील कैफियत ‘लढा ‘ कवितेतून मांडताना म्हणाले, ”सीमालढा हा सीमालढा, कोणी निर्मिला हा कोंडमारा ‘… अखंड महाराष्ट्राचा लढा भिजत पडला का तिढा ? ”

‘हाक ‘ कवितेतून व्यथा मांडताना ….
“जीवाची होतेय घालमेल सीमावाशीयांचा व्यथा मांडताना ……
जीव तीळ तीळ तुटतोय मातीशी इमान राखताना “…

या राष्ट्रीय चर्चा सत्रात अ. भा. साहित्य परिषदचे सरचिटणिस लेखक व कवी दशरथ यादव, कवी स्वामी निश्चलानंद (हि. प्र.), कवी अभिषेक अवचार (वाशिम), इस्रोचे शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ . सुभाष नाईक (गुजराथ), राजेंद्र सोनावणे, कवी गजेंद्र सलादे, कवी वनशिव या कवींनी कविता सादर केल्या.
डिजिटल युगात वाचन संस्कृती रुजावी व काव्यवाचनातून जीवनाचे तत्वज्ञान आत्मसात करावे. साहित्य हे बदलत्या संस्कृतीचे प्रतिबिंब काव्यातून सहज प्रकट होत. असे मत ८७ व्या अ. भा. सा. संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजयराव कोलते यांनी स्वागताध्यक्ष या नात्याने व्यक्त केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल. एम. पवार अध्यक्षस्थानी होते. कवयत्री अलका तालकर बीजभाषणातून कविता चर्चासत्राचा सार उलघडला .

प्राचार्य आर. व्ही. ढेरे म्हणाले , सीमाप्रश्न साहित्यिकांनी समजून घेवून ही बोथट होत असलेली धार सीमा बांधवांना न्याय देण्यासाठी चळवळ उभी करावी. सीमाबांधव न्याय हक्कांची लढाई लढत असून राजकिय इच्छाशक्ती उभी राहिली तर सीमाप्रश्न सुटायला वेळ लागणार नाही. असे प्रखड मत व्यक्त केले .
या राष्ट्रीय चर्चासत्रात महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजराथ व दुसऱ्या दिवशी बेळगांव येथील बलभीम साहित्य संघाचे कवी शिवाजी शिंदे, रविंद्र पाटील , नागेश राजगोळकर, जी. जी. पाटील, दत्ता कांबळे यांचा “कविता जनातल्या कविता मनातल्या ” या बहारदार काव्य मैफलीने रसिकांची मने जिंकली . तसेच महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील ९३ प्राध्यपक सहभागी झाले होते. यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ. जगदिश शेवते यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन प्रा. संदिप लांडगे यांनी केले तर आभार डॉ . विशाल पावसे यांनी मानले.

2 COMMENTS

  1. न्यूजटेल अल्पावधीतच लोकप्रिय अचूक व वेगवान पोर्टल… !

  2. न्यूजटेल अल्पावधीतच लोकप्रिय अचूक व वेगवान पोर्टल… !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here