सीएम चषक व्हॉलीबॉल स्पर्धेत मूरगुडचा राणाप्रताप अजिंक्य

0

मुरगूड प्रतिनिधी
बाचणी (ता.कागल) येथे झालेल्या सीएम चषक व्हॉलीबॉल (खुला गट )स्पर्धत मुरगूडच्या राणाप्रताप संघाने आदर्श बाचणी संघाला अंतिम सामन्यात हरवून प्रथम क्रमांक पटकावला.या संघाची जिल्हास्तरीय सीएम चषक स्पर्धसाठी निवड झाली आहे .
बाचणी येथे विद्युत झोतात झालेल्या सीएम चषक व्हॉलीबॉल स्पर्धत तालुक्यातील बारा संघानी सहभाग घेतला होता.यामध्ये मुरगूडच्या राणाप्रताप क्रीडा मंडळाच्या राष्ट्रीय खेळाडू अजित गोधडे,करण मांगले, विद्यापीठ खेळाडू सागर पाटील, अजित गुरव, ओंकार लोकरे,श्रावण कळांद्रे ,रविंद्र हळदकर यांच्या जोरदार स्मॅशिंगच्या जोरावर शाहु हायस्कुल ज्युनियर कॉलेज कागल यांचा (2-0) जयसिंगराव घाटगे ज्युनियर कॉलेज कागल यांचा (2-0) भगवा रक्षक कागल संघ (2-0) असा पराभव केला.
राणाप्रतापचा अंतिम सामना स्पर्धा संयोजक बाचणीच्या आदर्श क्रीडा मंडळा बरोबर होता.प्रकाशझोतात खेळवल्या गेलेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये बाचणी संघास 25-15 असे पराभूत केले.अजित गोधडेच्या भेदक सर्व्हिसमुळे बाचणी संघाचा बचाव कोलमडून पडला.मात्र दुसऱ्या सेटमध्ये बाचणीने निकराची लढत दिली.परंतु त्यांचे हे प्रयत्न विवेक चौगले याच्या अचुक लिफ्टींगमुळे व जीवन गोधडेच्या उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आणि सागर पाटील, अजित गुरव,करण मांगले , ओंकार लोकरे यांच्या भेदक स्मॅशनी हाणून पाडले आणि दुसराही सेट 25-21 असा जिंकत राणाप्रतापने प्रथम क्रमांक पटकावत सीएम चषकाचा मानकरी ठरला या संघाची जिल्हास्तरीय सीएम चषक स्पर्धसाठी निवड झाली आहे.
स्पर्धतील निकाल असा :पुरुष गटात प्रथम राणाप्रताप क्रीडा मंडळ मुरगुड, द्वितीय आदर्श क्रीडा मंडळ बाचणी, तृतीय
भगवा रक्षक कागल. महिलांमध्ये प्रथम क्रमांक आदर्श क्रीडा मंडळ बाचणी, द्वितीय क्रमांक शाहू हायस्कूल कागल, तृतीय जयसिंगराव घाटगे हायस्कूल कागल
विजेत्या राणाप्रताप संघास शिवराज ज्युनियरचे माजी प्राचार्य, व्हॉलीबॉल प्रशिक्षक महादेव
कानकेकर,संभाजी मांगले,विनोद रणवरे यांचे मार्गदर्शन लाभले.मंडळाचे अध्यक्ष सुखदेव येरूडकर, दिलीप मांगले, जनार्दन भाट, विजय गोधडे यांचे प्रोत्साहन लाभले .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here