रमेशराव रेडेकर गटाचा प्रा. संजय मंडलिक यांना पाठिंबा जाहीर

0

 

आजरा (प्रतिनिधी) :

चंदगड विधानसभा मतदारसंघात लक्षवेधी ताकद निर्माण केलेले भाजपा नेते उद्योगपती रमेशराव रेडेकर यांनी अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना पाठिंबा जाहीर केला. सरबंळवाडी (ता. आजरा) येथे कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेत हा पाठिंबा जाहीर केला. यावेळी आ. सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वागत व प्रास्ताविक करताना युवा नेते आदित्य रेडेकर यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. यावेळी बोलताना भाजपा नेते रमेशराव रेडेकर म्हणाले, गडहिंग्लज उपविभागात आम्ही भाजपाचे काम मोठ्या ताकदीने प्रामाणिकपणे सुरू ठेवले आहे. यामुळे कोणताही मनभेद न ठेवता शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे राहणार आहे. गडहिंग्लज उपविभागातून प्रा. मंडलिक यांना ५० हजाराचे मताधिक्य देणार असल्याचेही रेडेकर यांनी जाहीर केले.

आ. सुरेश हाळवणकर म्हणाले, कोणतीही सत्ता नसताना रमेशराव रेडेकर यांनी चंदगडकरांचे प्रश्न समजून घेतले आहेत. केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने दमदार कामगिरी केली आहे.

यावेळी कडगावचे सरपंच संजय बटकडली, भाजपाचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष हेमंत कोलेकर, शिवसेनेचे चंदगड तालुकाप्रमुख महादेव गावडे, वैभव पाटील, एल. टी. नवलाज यांची भाषणे झाली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनिता रेडेकर, प्रा. अनिता चौगुले, गडहिंग्लज पंचायत समिती उपसभापती विद्याधर गुरबे, संजय रेडेकर, प्रकाश शहापूरकर, नगरसेवक दीपक कुराडे, मल्हार शिंदे, चंद्रकांत जांगणूरे, वर्षा बागडी, गणपतराव डोंगरे, प्रभाकर खांडेकर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here