डहाणू पोलिसांना रक्षाबंधनाची ओवाळणी, डहाणूतील महिलांचा स्तुत्य उपक्रम

0

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-बहीण – भावाच्या पवित्र नात्याचा सणोत्सव देशभर साजरा होत असताना आज श्रावण पौर्णिमेला डहाणूतील महिला कमिटीच्या वतीने रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. डहाणूचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना या महिला भगिनींनी हाताच्या मनगटावर राखी बांधून समाजात शांतता, सुव्यवस्था व महिला सुरक्षा लाभावी, म्हणून कामना केली. तसेच प्रत्येक सणासुदीला आपल्या कुटुंबापासून दूर राहुन कर्तव्य बजावणाऱ्या खाकी वर्दीतील पोलीस भाऊरायांना दीर्घ आयुष्य,उत्तम आरोग्य व सुख लाभो यासाठी प्रार्थना केली.

वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणाला पोलीस यंत्रणा कामगिरी चोख बजावत असते. कर्तव्यनिष्ठ असलेला पोलीस मात्र यावेळी आपल्या कुटुंबासह नसतो. अनेकदा तो घरादारापासून दूरवर ड्युटी करत असतो. रक्षाबंधनाची ही उणीव भरून काढण्यासाठी डहाणू महिला समितीने हा उपक्रम राबवून पोलिसांप्रति भ्रातृभाव जोपासण्याचा प्रयत्न केला.

यावेळी महिला दक्षता कमिटी सदस्य ऍड. संयुक्ता तामोरे,कीर्ती मेहता,हर्षाला नायर,दक्षा जाधव,गौरी वागळे, रॉक्साना मझदा, सना शेख,अलमास शेख, सुजाता माळी,प्रिया राव, रश्मी पांचाळ,सबा शेख,आशा डहाट, भाग्यश्री डहाट,आदि महिला ऊपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here