एम आर प्रशालेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

0

गडहिंग्लज :येथील एम आर प्रशालेत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.. प्राचार्य एस. एस नाईक यांनी स्वामी विवेकानंद व प्रा. ए. ए. मगर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ‘उठा जागे व्हा, ध्येय सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका’ असा प्रेरणादायी मौलिक संदेश देणारे स्वामी विवेकानंद नेहमी आपल्या आचार विचार व कृतीने प्रेरित असत असे मनोगत माजी प्राचार्य एम बी कुंभार यांनी व्यक्त केले… “इतिहासातून वळूनी पाहती पाठीमागे जरा, झुकवूनी मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा”
शिवरायांवर अत्युच्च संस्कार करून स्वराज्याचे स्वप्न साकारले, त्यांच्या मनात कर्तुत्वाची ठिणगी टाकताना राजनीती हि शिकवली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. महिलांना संरक्षण आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी ना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा सत्वगुणांचे बाळकडू राजमाता जिजाऊ नी दिले.

आजही प्रत्येक मातेला वाटते शिवरायांसारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा अशा कर्तुत्वावान सुपुत्राला ज्या जिजाऊ घडविले. जोपर्यंत सुर्य चंद्र तारे राहतील तोपर्यंत या मातेचे कार्य चिरकाल टिकणार, असे मनोगत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा सुषमा पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रा.बी टी यादव, प्रा. व्ही ए पाटील श्री के वाय पाटील, श्री के डी पोवार, श्री एस एस पेडणेकर, श्री आर वाय नाईक, शेख एस एस, प्रा. एस ए पाटील, प्रा. एस ए एस शिंदे, प्रा. सोहनी आर व्ही प्रा. साबळे व्ही व्ही, प्रा. तळगुळकर पी एस,प्रा. कोटीवाले एस आर,प्रा. स्वाती खोपडे वाघेरा एस, जे जे तळपे व विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here