“सरकारच्या बाजूने लिहिले कि भक्त आणि विरोधी लिहिले की देशद्रोही”- राज ठाकरे

मी सोशल मीडियाचा वापर करणार तुम्हीही करा राज यांचे आवाहन

0

प्रतिनिधी- रवी सपाटे
जर आपल्याला आपली मते मांडायची असतील तर आपण आपल्या सोशल मीडियाचा वापर करू आपल्याला या मीडियाची गरज नाही असा वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.ते ठाण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार सम्मेलनाच्या “हास्यदर्शन” या कार्यक्रमात बोलत होते.
तसेच आजच्या काळात सरकारच्या बाजूने लिहिले कि भक्त आणि विरोधी लिहिलेकी देशद्रोही मानले जातात हि अप्रत्यक्ष टीकाहि त्यांनी सरकारवर केली. तसेच मराठी संपादकांना माझी व्यंगचित्र परवडणार नाहीत मी यासाठी माझ्या सोशल मिडीयाचाच वापर करतो आणि तुम्हीही तेच करा असे आवाहन यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here