राज ठाकरेंना शरदरावांनी दिला धक्का

0

मुंबई (प्रतिनिधी) :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या आधीच एक धक्का बसला आहे. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचे आमदार शरद सोनावणे यांनी हातावर शिवबंधन बांधले आहे. मनसेच्या सहा नगरसेवकांनी मनसेला रामराम केला आहेच. त्यापाठोपाठ आता एकमेव आमदार शरद सोनावणे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दरम्यान जुन्नर तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शरद सोनावणे यांच्या पक्षप्रवाशावर तीव्र विरोध दर्शवला होता. आमची भूमिका ऐकून न घेता शरद सोनावणे यांना उमेदवारी दिली तर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आपापल्या पदाचा सामूहिक राजीनामा देतील, असा इशाराही दिल्याची चर्चा होती. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या बुडत्या नौकेला शरद सोनावणे यांनी वाचवलं होतं. मात्र आता सोनावणे यांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला आहे. त्यामुळे राज ठाकरेंसाठी हा धक्काच मानला जातो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here