जुमलेबाजी करणारे मोदी-शहा देशाचे कलंक: देशाच्या राजकीय क्षितिजावरून त्यांना हटवा

0

BY Newstale
Special Correspondent
Murgud
16 March 2019

इचलकरंजी सभेत ‘राज’ तोफ धडाडली

मोदी शहा देशाचे कलंक

कामगार आंदोलने चिरडून टाकतील

नोटा बंदीनंतर 2019 पर्यंत निवडणुकीत वापरलेला पैसा भाजपकडे आला कोठून

मोदी शहा यांच्यावर कठोर टिका

काय म्हणाले राज ठाकरे आपल्या भाषणात….

देशातील कोणताही राजकारणी तुमच्यासमोर बोलायला उभा राहिला की तेव्हा तो खोटं बोलणार नाही,तुम्हाला खोटी स्वप्ने दाखवणार नाही असा धडा शिकवा त्याची सुरुवात लोकसभा निवडणुकीपासून करा.

उद्यमशीलता मराठी मातीचा गुण….

महाराष्ट्र सर्व क्षेत्रात गुजरातच्या पुढे आहे. उद्योजकता महाराष्ट्राच्या मातीचा गुण आहे.राज्याचे हे यश कोणत्या नेत्यांमुळे नाही.1904 साली इचलकरंजीत वस्त्रोद्योगास सुरवात झाली. 1970 साली छोट्या फॅमिली कारचा प्रयोग येथेच झाला. अशा उद्यमशील राज्यातील उद्योगधंदे, कामगार उध्वस्त करण्याचे धोरण मोदी शहा यांच्या भाजपचे आहे.असे सांगून कोठे आहे तुमचा मेक इन इंडिया असा सवाल त्यांनी केला.
लोकशाही संकटात ….
देशाची लोकशाही संकटांमध्ये आली आहे.या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायालयाच्या बाहेर येतात आणि पत्रकार परिषद घेऊन सांगतात की या देशाची लोकशाही धोक्यात आहे.असा प्रसंग 1947 च्या स्वातंत्र्यापासून या देशाने आजपर्यंत कधीही पाहिला नव्हता.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकशाही धोक्यात आहे असं सांगतात. एका न्यायाधीशांचा खून झाला या खटल्यात संशयाचे बोट अमित शहांकडे होतं या खटल्यात या न्यायाधीशांवर दडपण आले म्हणून ते रस्त्यावर आले आणि रस्त्यावर येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

रिझर्व्ह बँकेची अवस्था …
सरकार आमच्यावरती प्रेशर आणते तुम्ही सांगाल ते करणार नाही.तसं वागणं आम्हाला परवडत नाही.असं सांगून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे दोन गव्हर्नर रघुराम राजन आणि उर्जित पटेल राजीनामे देतात असे या देशात
आज पर्यंत कधीही घडलं नव्हतं.

पंतप्रधानांना झटका येतो …
आमच्या देशाच्या पंतप्रधानांना एक झटका आला आणि त्यानी नोटा बंद करून टाकल्या.मंत्रीमंडळाला अंधारात ठेवले.असं काय झाले तुम्ही त्यांना विश्वासात का घेऊ शकला नाही ? हातामध्ये देश आहे, ईडी,इन्कम टॅक्स,गुप्तचर यंत्रणा तुमच्या हातात असताना काळा पैसा कोणाकडे आहे हे कळत नाही ? असा प्रश्न त्यांनी केला.

500 ते 800 कोटी रुपयांच्या खोट्या नोटा (फेक करन्सी) साठी लाखो कोटींच्या नोटा बंद करून टाकल्या. नोटाबंदीमुळे या देशातील साडेचार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या.अनेक उद्योगधंदे बंद झाले.यंत्रमाग कामगार उद्ध्वस्त झाले. भारतात इतकी वर्ष उद्योग सुरू होते ते आता बंद पडत आहेत.

काळा पैसा परदेशातून आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार होते.आता निवडणुकीच्या प्रचारामध्ये यावर शब्द काढायला तयार नाही.

स्विस बँकांमधील पैसा केंव्हा आणणार..

स्विस बँका व्यवसाय करतात त्या अमेरिकेचे पैसे सुद्धा परत देत नाहीत भारत तर खूप लांबची गोष्ट आहे या बाबी लपवून राजकारणी तुम्हाला मूर्ख बनवतात तुम्हाला खोटी स्वप्न दाखवतात आणि त्याच्यावर चकार शब्द काढत नाही
इतकी खोटारडी माणसे मी आयुष्यात पाहिली नाहीत.

अगोदरचे नालायक आहेत म्हणून यांच्यावर विश्वास ठेवला आणि यावेळी केसाने गळा कापला.गंगासागर प्रकल्पातील गंगेच्या शुद्धीकरणासाठी उभे केलेले 20 हजार कोटी रुपये कुठे गेले असा सवाल त्यांनी विचारला.

मोदी पहिले पंतप्रधान….
पत्रकारांच्या समोर जायला आमचा पंतप्रधान घाबरतो हा पहिला पंतप्रधान आहे ज्याने पाच वर्षांमध्ये एक ही पत्रकार परिषद घेतली नाही.देशाला उत्तरे द्यायला हा माणूस बांधील नाही.ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी बद्दल बोलायला तयार नाही.

भारत पाक निवडणुकीपुरते…
निवडणुकीच्या तोंडावर भारत-पाकिस्तान उभा करत आहेत.इमरान खान मोदी निवडून आले पाहिजेत असे सांगतो.दुष्मन देशाचा पंतप्रधान असं सांगत असेल आमची मुले सरहद्दीवर शहीद होत आहेत आणि आमचा पंतप्रधान पाकिस्तानात जाऊन केक आणि बिर्याणी खातो अशी टीका त्यांनी केली.अंबानी आणि अदानी यांना सीमेवर शस्त्र घेऊन पाठवा असा सल्लाही त्यांनी दिला.मोदी आणि शहा या देशाला कलंक आहेत अशी जहरी टीका त्यांनी केली

मोदी देशाला रशियाच्या मार्गाने घेऊन जात आहेत….
आठ दहा पंधरा लोक या देशाच्या आर्थिक नाड्या सांभाळणार सर्व जनतेला गुलाम बनवणार.हे सर्व रशियाच्या धरतीवरती जात आहे.या देशातील या देशातील लोकशाही त्यांना संपवून टाकायची आहे.या देशातला लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकायची आहे. हीच गोष्ट हिटलर केली माध्यमांची मुस्कटदाबी केली.एक खोटे दहा वेळा बोलत राहिलात तर ते खरे वाटायला लागते ही गोबेल्स नीती आहे.हिटलर प्रचारासाठी चित्रपटांचा वापर करायचा.पॅडमॅन उरी सारखे चित्रपट बनवून मोदी आपल्यासाठी लोक धारणा तयार करत आहेत.

2014 साली जे झालं ते झालं ते वाईट स्वप्न होतं.या देशाच्या राजकीय क्षितिजावरून नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघे नष्ट होणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here