रेल्वेतर्फे देशभरातील १२ लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय

रेल्वेतर्फे देशभरातील ८ हजार ५०० स्थानके आणि  ११ हजार गाड्यांमध्ये १२ लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय

0

नवी दिल्‍ली :- रेल्वेतर्फे देशभरातील ८ हजार ५०० स्थानके आणि  ११ हजार गाड्यांमध्ये १२ लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेनुसार गाड्यांमधील प्रत्येक डब्यात ८ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. याशिवाय रेल्वेस्थानकातील प्रत्येक महत्त्वाच्या भागात सीसीटीव्हीची नजर असेल. सध्या ३९५ स्थानके आणि ५० गाड्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा आहे. राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि लोकलमध्ये पाळत ठेवणारी अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाईल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here