राहुल गांधींना चाबकाचे फटके द्या, तेव्हाच त्यांना सावरकर कळतील- उद्धव ठाकरे

0

 

हिंगोली : स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द बोलणारे काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी हिंगोली येथील सभेत त्यांचा चांगलाच समाचार घेतला . सावरकर अंदमानच्या ज्या कोठडीत होते तेथे २४ तास राहूल गांधी ठेवा, कोलू फिरवायला लावा, चाबकाचे फटके द्या, मग त्याला सावरकर कळतील. चला मुरारी हिरो बनणे, इटली नाही हिंदुस्थान आहे लक्षात ठेव, असा टोला उद्धव यांनी राहुल गांधींना लगावला आहे .

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे .हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार तथा आमदार हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी हदगाव येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते .

उद्धव ठाकरे म्हणाले की, “आजच्या सभेचा मुहूर्त चांगला आहे, आज रामनवमी आहे, तर उद्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या दोन्ही दिवसाचा मुहूर्त साधून येथे आलो आहे, तुमचे आजचे हे विराट रुप म्हणजे भगवे तुफान आले आहे.” आमच्या सभेला माणसं भाड्याने आणावे लागत नाहीत, तर भगव्या विचारावर प्रेम करणारा जनसागर येथे आला आहे . महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे . मी तुम्हाला, महाराष्ट्राला शब्द देतो,सत्तेत असलो तरीही शेतकर्‍यांची साथ कधी सोडणार नाही, सत्तेसाठी कधी लाचार होणार नाही, असे वचन उद्धव ठाकरे यांनी दिले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here