राधानगरीत हायस्कूलमध्ये कॉम्प्युटर चोरी

0

राधानगरी (प्रतिनिधी) :

सरस्वती शिक्षण प्रसारक संस्था संचलित जागृती हायस्कूल राधानगरी येथील माध्यमिक शाळेतील कॉम्प्युटर लँब मधील चार मॉनिटर व दोन सर्वर सीपीयू असे सुमारे दीड लाखाचे साहित्य चोरांनी लंपास केल्याची घटना घडली आहे

या हायस्कूलमध्ये दोन वर्षापासून कॉम्प्युटर लॅब सुरू आहे. या लॅब मध्ये दोन सर्वर सीपीयू व बारा मॉनिटर असा वापर होता. यातील चार मॉनिटर व दोन सर्वर सीपीयू रविवारी मध्यरात्री अज्ञात इसमाकडून चोरीला गेली आहेत. या वस्तूंचा बाजारभावाप्रमाणे सुमारे दीड लाख रुपये होत असुन सोमवारी सकाळी सकाळच्या शाळेसाठी आलेला शिपाई प्रल्हाद कुंभार यांनी दार उघडून पाहिले असता चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक एम. बी. चौगुले व कॉम्प्युटर शिक्षक विक्रम चरापले यांनी नोंद केली आहे. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करून तपास करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, अजित देसाई, संस्थेचे संस्थापक डॉ. व्ही. बी. सरावणे यांनी भेट दिली पुढील तपास पी. बी. गोजारे हे करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here