राधानगरी तालुक्यातील रस्त्यांसाठी ४.२६ कोटी निधी : आ. आबिटकर

0

गारगोटी (प्रतिनिधी) :
मुख्यमंत्री ग्राम सडक तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत राधानगरी तालुक्यातील ५.२५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी ४ कोटी २३ लाख रुपयांच्या निधी मंजूर झाल्याची माहिती आ. प्रकाश आबिटकर यांनी दिली.
आ. आबिटकर म्हणाले, राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या विस्तारित मतदारसंघ असून वाड्यावस्त्यांनी विखुरलेला असल्यामुळे रस्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गेल्यास ४ वर्षांपासून मतदार संघातील रस्ते निर्मितीसाठी प्राधान्याने प्रयत्न सुरु आहेत. गेली ४ वर्ष सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच राधानगरी-भुदरगड व आजरा तालुक्यातील दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये दळणवळण करणे सोईचे झाले आहे. या निधीसाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांचे सहकार्य लाभल्याचे आ. आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे सांगितली.
राधानगरी तालुक्यातील गेली कित्येक वर्ष दळणवळण अभावी प्रलंबित असणारा इजिमा ५२ ते कुपलेवाडी (कोणोली) रस्ता १.७२३ कि.मी. करीता १ कोटी ५३ लाख निधी, केळोशी बुद्रुक ते शिंदेवाडी रस्ता सुधारणा करणे १.७०० कि.मी. करीत १ कोटी ३० लाख, केळोशी बुद्रुक ते माळवाडी रस्ता सुधारणा करणे १.८२५ कि.मी. करिता १ कोटी ४२ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. राधानगरी तालुक्यातील कुपेलवाडी (कोणोली) रस्तावर देश स्वतंत्र झाल्यानंतर आजपर्यंत अद्याप डांबर पडले नव्हते. आ. आबिटकर यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केलेनंतर या रस्त्यासाठी त्यांनी प्रयत्न करून १ कोटी ५३ लाख रुपये निधी उपलब्ध केला असून ग्रामस्थांमधून त्यांच्या कामांबद्दल कृतज्ञता व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here