खासदार धनंजय महाडिक यांचा राधानगरी तालुक्यात झंझावात

0

 

राधानगरी : खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्यात घेतलेल्या मेळाव्यांना, प्रचारयात्रांना आणि सभांना भरभरून प्रतिसाद मिळतोय. विविध स्तरातील मान्यवर, सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामस्थ खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी उत्स्फूर्तपणे राबताना दिसत आहेत.

नुकताच खासदार धनंजय महाडिक यांनी आवळी खुर्द, कंथेवाडी, कळंकवाडी, पुंगाव, राशिवडे खुर्द, आणाजे, खुडेवाडी, शिरगाव, तारळे खुर्द,सिरसे, आवळी बुद्रुक, तरसंबळे, गुडाळ, पिरळ, कसबा तारळे, कुडुत्री, आमजाई व्हरवडे, सोन्याची शिरोली, कांबळवाडी, मुसळवाडी, खिंडी व्हरवडे या गावांचा दौरा केला.

या दौर्‍यात खासदार धनंजय महाडिक यांना अनेकांनी पाठिंबा दर्शवला. राधानगरी तालुक्यातून मताधिक्य देण्याचं वचन अनेकांनी दिलं. एकंदरीतच राधानगरी तालुक्यात खासदार धनंजय महाडिक यांचंच पारडं जड दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here