राधानगरी क्रीडासंकुलाची कामे त्वरित पूर्ण करा : आ. आबिटकर

0

राधानगरी (प्रतिनिधी) :
राधानगरी क्रीडासंकुलाची कामे तातडीने पूर्ण करून ते खेळाडूंसाठी लवकर उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना आ. प्रकाश आबिटकर यांनी केल्या.
रखलेल्या राधानगरी क्रीडासंकुलाच्या कामाला गती येण्यासाठी शुक्रवारी राधानगरी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी आ. आबिटकर बोलत होते. क्रीडा संकुल समितीकडील निधीतून ही कामे होत असून या संकुलाची कामे रखडली आहेत. या क्रीडासंकुलात आतापर्यंत क्रीडा संकुलाची इमारत, संरक्षण भिंत, इतकीच तुटपुंजी कामे झाली आहेत त्यामुळे त्याचा परिपूर्ण वापर खेळासाठी होऊ शकत नाही. निधी खर्चून उभारलेली क्रीडा संकुलाची इमारत अपुऱ्या सोयी मुळे गैरसोयीची ठरत आहे त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या निधीतून या इमारतीची डागडुजी सह उर्वरित संरक्षण भिंत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. सध्या सरावासाठी येथे असलेल्या इमारतीत कोणत्याही प्रकारच्या तालुका स्तरीय स्पर्धा या ठिकाणी होत नाहीत म्हणून त्वरित मॅट ची व्यवस्था करण्यात यावी असे सांगण्यात आले. तसेच तालुकास्तरीय क्रीडा शिक्षकांची समिती स्थापन संकुल पूर्ण क्षमतेने त्याचा वापर करावा. क्रीडा संकुल समितीची धर्मादाय उपायुक्त कडे नोंदणी करावी. कबड्डी साठी सह मैदान तयार करावे त्यासाठी विशेष बाब म्हणून निधीची उपलब्धता करून देण्याची ग्वाही आमदार आबिटकर यांनी यावेळी दिली. या बैठकीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, तालुका अधिकारी सचिन चव्हाण, नूतन तहसीलदार अभिजित तायशेटे, संभाजी आरडे, नायब तहसीलदार विजय जाधव, बांधकाम अभियंता एस. बी. सांगावकर, क्रीडाशिक्षक शशिकांत बैलकर, अरुण पाटील, क्रीडा प्रेमी यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here