पुणे जिल्हा परिषदेवर धडकला संगणक परिचालकांचा मोर्चा !!!

0

जिल्ह्यातील संगणक परिचालक बेमुदत उपोषणावर…

थकीत मानधन,मानधनाबाबत असलेली टास्क कन्फेर्मशन हि जाचक अट,ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरील सर्व संगणक परीचालकांना या प्रकल्पात सामावुन घेण्यात यावे, प्रिया सॉफ्टच्या नावाखाली कपात केलेले मानधन परत देण्यात यावे. “ई-ग्राम” सोफ्टवेअर बोगस असून ते बदलुन द्यावे. नागरिकांना देण्यात येणाऱ्या दाखल्यांमागे संगणक परिचालकांना प्रोत्साहनपर ६० % कमिशन द्याव व संगणक परिचालकांना “केंद्रचालक” म्हणून संबोधावे आणि शासकीय  कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा द्याव्यात. या व इतर मागण्यासाठी सुरु असलेले संगणक परिचालकांच्या आंदोलन चा आज मुख्य दिवस आजपासून सर्व संगणक परिचालकांनी बेमुदत आमरण उपोषण घोषित केले असून पुणे जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी थेट जिल्हा परिषदेवरच आपला मोर्चा नेला आहे व परिषदेच्या गेटवरच उपोषणाला बसले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here